Talwar Baba : अंगात संचार येतो, हातात तलवार घेवून भक्तांना भुलथापा मारतो; भोंदू खरातनंतर आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा समोर

देवीचा संचार असल्याचे सांगून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप असून अटकेदरम्यान पोलिसांशी धक्काबुक्कीही केल्याचे समोर आले आहे.

Talwar Baba : अंगात संचार येतो, हातात तलवार घेवून भक्तांना भुलथापा मारतो; भोंदू खरातनंतर आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा समोर

नांदेड: राज्यात एकीकडे स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे वातावरण तापलेले असतानाच आता आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे ‘तलवार बाबा’ म्हणून ओळखला जाणारा ज्ञानेश्वर कोरडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंगात देवीचा संचार होतो, दैवी शक्ती आहे, असा दावा करत तो लोकांना फसवत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा भोंदू बाबा अंगात ‘वारं भरल्याचा’ आव आणत हातात तलवार घेऊन लोकांसमोर नाट्यमय प्रकार करत असे. देवीचा संचार झाल्याचे सांगून तो नागरिकांना भूलथापा देत फसवत असल्याचा आरोप आहे.

पोलिसांशी धक्काबुक्की

धक्कादायक बाब म्हणजे अटकेदरम्यान या ‘तलवार बाबा’ने आणि त्याच्या भक्तांनी पोलिसांशीही उद्धट वर्तन केले. पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली असून या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Rohit Pawar: “भोंदू खरातला संवपले जाणार?” फेसबुक पोस्टद्वारे प्रश्न विचारात रोहित पवारांनी व्यक्त केली शंका

या घटनेनंतर बिलोली पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे यांनी दिली आहे.

आणखी खुलास्यांची शक्यता

दरम्यान, या तलवार बाबामागे कोणाचा हात आहे, त्याला कोणाची मदत मिळत होती आणि किती लोकांची फसवणूक झाली आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तसेच अटकेदरम्यान पोलिसांशी केलेल्या धक्काबुक्कीप्रकरणी त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल होणार का, याकडेही लक्ष लागले आहे.

राज्यात भोंदू बाबांचे प्रकार पुन्हा एकदा समोर येत असून प्रशासन अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई करणार का, हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे. 

हेही वाचा: Eknath Khadse: कागदपत्रांत खाडाखोड आणि वतन जमिनीचा पेच; एकनाथ खडसेंनी फेटाळले आरोप, काय आहे नेमकं प्रकरण?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number