हसल्याच्या कारणावरुन तरुणाचे हात छाटले

नांदेड, १८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नांदेडमध्ये गुरुवारी केवळ हसल्याच्या कारणावरुन एका फळविक्रेत्याने भाजीपाला विकणाऱ्या तरुणाचे दोन्ही हात छाटले. फळविक्रेत्याने भाजीपाला विक्रेत्या तरुणाचे दोन्ही हात कोयता वापरून छाटले. मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर हात छाटणारा मोहम्मह तौहिद फरार आहे. तरुणाचे हात मनगटापासून पुढे छाटण्यात आले. ही धक्कादायक घटना नांदेडच्या डी […]

हसल्याच्या कारणावरुन तरुणाचे हात छाटले

नांदेड, १८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नांदेडमध्ये गुरुवारी केवळ हसल्याच्या कारणावरुन एका फळविक्रेत्याने भाजीपाला विकणाऱ्या तरुणाचे दोन्ही हात छाटले. फळविक्रेत्याने भाजीपाला विक्रेत्या तरुणाचे दोन्ही हात कोयता वापरून छाटले. मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर हात छाटणारा मोहम्मह तौहिद फरार आहे.

तरुणाचे हात मनगटापासून पुढे छाटण्यात आले. ही धक्कादायक घटना नांदेडच्या डी मार्ट परिसरात घडली. आठवडी बाजारात भर दुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हात छाटणाऱ्या मोहम्मह तौहिद याचा शोध सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number