Nanded Crime News: नांदेडमध्ये 48 तासांत पाचवा खून, मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला भर रस्त्यात संपवलं

वाढत्या घटनांमुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Nanded Crime News: नांदेडमध्ये 48 तासांत पाचवा खून, मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला भर रस्त्यात संपवलं

नांदेड शहरात भीतीचं सावट अधिक गडद होत चाललं आहे. ‘कायदा आणि सुव्यवस्था’ या संकल्पनेलाच जणू आव्हान देणाऱ्या सलग खुनांच्या घटनांनी नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना घर करून बसली आहे. 

सोमवारी. दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी पहाटे सुमारे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान नांदेडमधील श्रीनगर परिसरात आणखी एक निर्घृण खून झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता सोनू कल्याणकर (वय 35) याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने सपासप वार करत त्याची हत्या केली. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या कल्याणकरला दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी घेरले आणि पोट व पाठीत वार करून घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत तो जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: Share Market Today: शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पडझड; सेन्सेक्स 377 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले

विशेष म्हणजे, सोनू कल्याणकर याच्यावर यापूर्वीही तीन वर्षांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. रींदा गँगशी संबंधित गोलू मंगनाळे याने त्याच्यावर गोळीबार केला होता. त्या वेळी तो थोडक्यात बचावला होता. सध्या गोलू मंगनाळे तुरुंगात असला, तरी या खुनामागे त्याचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, नांदेड शहरात गेल्या 48 तासांत हा पाचवा खून ठरला आहे. दोन दिवसांपूर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिहेरी हत्याकांड घडल्याने आधीच शहर हादरले होते. त्यातच आता आणखी एका राजकीय कार्यकर्त्याच्या हत्येमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. गुन्हेगारीचा हा वाढता आलेख प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

सोनू कल्याणकर हा स्थानिक पातळीवर सक्रिय आणि ओळख असलेला कार्यकर्ता होता. काही दिवसांपूर्वी त्याने भाजपमधून बाहेर पडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर या हत्येला राजकीय रंग आहे का, याचीही चर्चा रंगू लागली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा: Laxman Hake: 'मला ताईंसह अनेक वरिष्ठ नेत्यांचे फोन आले म्हणून मी…'; बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेताना लक्ष्मण हाकेंनी मांडली ओबीसींची व्यथा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number