जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
नाणार भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्च स्तरीय समितीला असून हे सरकारचं मत नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ‘उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द केली आहे. त्यामुळे आता नाणार प्रकल्प होणार नाही.’ असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणारमधील सभेत केला होता. मात्र, अशी कोणतीही अधिसूचना अद्याप सरकारने रद्द केलेली नाही. असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितलं.
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचं नोटिफिकेशन रद्द करण्याबाबतचं मत वैयक्तिक असल्याचंही ते यावेळी म्हणाले .राज्याच्या आणि कोकणाच्या हिताचाच निर्णय सरकार घेईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले अाहेत.