वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, ते लगेच चिडतात अशी टीका जाहीरपणे करून खळबळ उडवून देणारे आणि त्यानंतर सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा समाचार घेणारे भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी आज लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय.
मोदी सरकारच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळातील हे पहिलं बंड मानलं जातंय. नाना पटोलेंनी आपला राजीनामा लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे सोपवलाय.
गुजरातमधील मतदानाला काही तास शिल्लक असताना, भाजपचाच एक खासदार मोदी सरकारवर हल्ला चढवत बाहेर पडल्यानं विरोधकांना आयतंच कोलीत मिळालंय.
खासदार नाना पटोले यांचा परिचय
54 वर्षीय नाना पटोलेंचा जन्म भंडाऱ्यातील शेतकरी कुटुंबात झाला
शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी मोठं काम, मतदारसंघात नानाभाऊ म्हणून परिचित
1990 साली भंडाऱ्यातील सांगडीतून जिल्हा परिषदेवर निवडून गेले
1999 पासून सलग तीन वेळा साकोली मतदारसंघातून विधानसभेवर गेल
काँग्रेसचे उपनेते म्हणूनही काम, 2014 आधी पक्षाच्या धोरणावर नाराज होऊन बाहेर
भंडारा-गोंदिया मतदारसंघातून 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेलांचा 1 लाख 49 हजार मतांनी पराभव केला