जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
‘जय महाराष्ट्र’च्या बातमीमुळे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नलिनी डवर यांना मदतीचा हात मिळाला आहे. बातमी पाहताच सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाईंनी 51 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नलिनी डवर यांच्यावर शिवणकाम करण्याची वेळ आली.
नोकरी अभावी फरफट होत असल्याने राज्य सरकारने मदतीचा हात देण्याची गरज आहे. सात महिन्यांची असताना नलिनीला तापाचे निदान झाले आणि त्यात एका पायाला अपंगत्व आले,मात्र नलिनीने त्यावर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर इथं पर्यंत झेप घेतलीय. एक पाय अपंग असतानाही नलिनीने गोळफेक, थाळीफेक,लांब उडी आशा मैदानी खेळात लख्ख यश मिळवले.
आजवर तब्बल शंभर स्पर्धातून 65 बक्षिसे तिने मिळवली आहेत. 2014- 15 चा पुरस्कार फेब्रुवारी 18 मध्ये मिळाला या पुरस्काराने तिच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. मात्र त्या पूर्ण करायला नलिनीची परिस्थिती आडवी येत आहे. आई वडील शेतकरी असल्याने नलिनीना त्यांना त्रास द्यायचा नाहीय. त्यामुळे ती काही अपेक्षा मारून सध्या निमूटपणे शिवणकाम करत आहे.