पाहणी करणारे म्हणतात..नालेसफाई 100% होऊ शकत नाही- आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईच्या नालेसफाई कामात घोटाळा कायम आहे असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी केला. तसंच नालेसफाईच्या कामाबाबत भाजप आणि मुंबईकर शंभर टक्के असमाधानी असल्याची अप्रत्यक्ष टीका देखील आशिष शेलारांनी शिवसेनेवर केली.   जे बोलतो ते करून दाखवणारे आता करून दाखवू शकत नसल्याचं म्हणत शेलारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुंबईतले नालेसफाईची […]

पाहणी करणारे म्हणतात..नालेसफाई 100% होऊ शकत नाही- आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या नालेसफाई कामात घोटाळा कायम आहे असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी केला. तसंच नालेसफाईच्या कामाबाबत भाजप आणि मुंबईकर शंभर टक्के असमाधानी असल्याची अप्रत्यक्ष टीका देखील आशिष शेलारांनी शिवसेनेवर केली.

 

जे बोलतो ते करून दाखवणारे आता करून दाखवू शकत नसल्याचं म्हणत शेलारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुंबईतले नालेसफाईची कामं कधीच पूर्ण होऊ शकत नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. ‘नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते.

 

नालेसफाई पावसाच्या आधी पावसानंतर पुन्हा चालूच असते. त्यांच्यामुळे नालेसफाई पूर्ण हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. ही सातत्याने चालू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पावसाच्या पूर्वी जी कामं करायची आहेत तू पूर्ण केली जातील’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

 

त्यानंतर जे बोलतो ते करून दाखवणारे आता करून दाखवू शकत नसल्याचं म्हणत शेलारांनी उद्घव ठाकरेंवर निशाणा साधला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number