नालासोपारा स्फोटकप्रकरणी एटीएसचा कोर्टात मोठा खुलासा…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई नालासोपारा स्फोटक प्रकरणी वैभव राऊतसह तिघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे आरोपी पुण्यात आणि बेळगावात बॉम्बस्फोट घडवणार होते. आज सेशन्स कोर्टातील सुनावणीवेळी एटीएसने कोर्टात धक्कादायक माहिती दिली आहे. आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टात शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि वैभव राऊतला हजर केलं होते. यावेळी पुण्यातील ‘वेस्टर्न म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये […]

नालासोपारा स्फोटकप्रकरणी एटीएसचा कोर्टात मोठा खुलासा…
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नालासोपारा स्फोटक प्रकरणी वैभव राऊतसह तिघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे आरोपी पुण्यात आणि बेळगावात बॉम्बस्फोट घडवणार होते. आज सेशन्स कोर्टातील सुनावणीवेळी एटीएसने कोर्टात धक्कादायक माहिती दिली आहे.
आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टात शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि वैभव राऊतला हजर केलं होते.
यावेळी पुण्यातील ‘वेस्टर्न म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये तर बेळगाव येथे ‘पद्मावती शो’ मध्ये बाॅम्ब स्फोट घडवण्याची योजना असल्याचा धक्कादायक खुलासा कोर्टामध्ये केला आहे. जी शस्त्रे सापडली आहेत ती मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातून आणली आहेत. यांची 2 प्रक्षिशणकेंद्रं महाराष्ट्रात तर इतर महाराष्ट्राबाहेर आहेत, अशी माहितीही एटीएसने दिली आहे.
या तपासात मोठी प्रगती झाली असून विविध राज्यात चौकशी सुरु आहे. 

आज कोर्टात नक्की काय घडलं – 

एटीएसचे वकील – 

  • शरद कळसकरच्या घरी सापडलेल्या काॅम्प्युटर मधून डिकोड स्वरूपात माहिती मिळाली आहे त्याचा अधिक तपास सुरू आहे.
  • या प्रकरणात सुधनवा गोंधळेकर याची चौकशी केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, पुण्यातील वेस्टर्न म्युझिक कन्सर्ट येथे बॉम्ब स्फोट घडविण्याचा कट  होता तर बेळगाव येथे पद्मावत या चित्रपटाच्या  शो मध्ये स्फोट घडवायचा होता. हे सगळं हिंदू संस्कृतीच्या विरोधात आहे असं त्यांचं म्हणणं आहे असा युक्तिवाद एटीएसच्या वकिलांनी केला .
  • गोंधळेकरच्या घरातून पिस्तुल, कट्यार, जिवंत काडतुसे सापडली
  • या आरोपींना प्रशिक्षण देणारी  केंद्र यातील  2 महाराष्ट्रात  आहेत आणि इतर महाराष्ट्र बाहेर आहेत
  • या प्रकरणात बॉम्ब बनविणे ते बाळगणे, रेकी करणे, अवैध शस्त्र बाळगणे असा सहभाग आहे
  • अारोपींकडून वेगवेगळी वाहन आम्ही जप्त केली आहेत. तसंच जी शस्त्रे सापडली आहेत  ती मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातून आणली आहेत आम्हाला तिथे या आरोपींना घेऊन जायचं आहे
  • अारोपींना आर्थिक स्वरूपात बळ कोणी दिलं आहे हे आम्हला शोधायचं आहे
  • आम्हला यांचा मास्टर माईंड शोधायचा आहे यासाठी यांच्या पोलीस कोठडीत वाढ करून मिळावी


बचाव पक्षाचे वकील –

अटक केलेल्या आरोपींचा नेमका उद्देश काय आहे हे अद्यापही पोलिसांना सांगता आले नाही.

ही सर्व माहिती काॅम्प्युटरमध्ये आहे, त्यामुळे याची चौकशी आरोपींना न्यायालयीन ताबा देऊन करता येते.

18 दिवसांत पोलिसांना आरोपींचा उद्देश कळला नाही मग आरोपींना पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.

सीबीआयचे वकील –

आम्हाला शरद कळसकर ची पोलीस कस्टडी हवी आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकर चा सहभाग आहे त्यामुळे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांची समोरासमोर चौकशी करायची आहे.

एटीएसचे वकील –

आमचा तापस महत्वाच्या एका टप्प्यावर आहे त्यामुळे शरद कळसकर चा ताबा आम्ही सीबीआयला देऊ शकत नाही. जर सीबीआयची  चौकशी झाल्यानंतर शरद कळसकर ची पोलीस कस्टडी आम्हाला न्यायालय देत असेल तर आमची काही हरकत नाही .

बचाव पक्षाचे वकील –

शरद कळसकर सीबीआयच्या ताब्यात  देता येत नाही सध्या एटीएसच्या ताब्यात आहे. एका गुन्हयात अटक असताना दुसऱ्या खटल्यात आरोपी  अटक केल्याशिवाय कस्टडी देता येत नाही असा उदाहरणांसह बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यावर शरद कळसकरला सीबीआयच्या कस्टडीमध्ये द्यायचे की नाही याचा निर्णय दुसऱ्या दिवशी देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number