नागराज मंजुळेंनी दिल्या ‘सैराट’च्या हिंदी रिमेक सिनेमाला शुभेच्छा!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ‘धडक’ हा सिनेमा उद्या रिलीज होणार आहे. हा सिनेमा ‘सैराट’ या गाजलेल्या सिनेमाचा हिंदी रिमेक असल्याने या सिनेमाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.  करण जोहरची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सैराट’ सिनेमाचे दिग्दर्शक-लेखक नागराज मंजुळे यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट […]

नागराज मंजुळेंनी दिल्या ‘सैराट’च्या हिंदी रिमेक सिनेमाला शुभेच्छा!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ‘धडक’ हा सिनेमा उद्या रिलीज होणार आहे. हा सिनेमा ‘सैराट’ या गाजलेल्या सिनेमाचा हिंदी रिमेक असल्याने या सिनेमाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 

करण जोहरची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

‘सैराट’ सिनेमाचे दिग्दर्शक-लेखक नागराज मंजुळे यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट लिहीली असून त्यातून त्यांनी ‘धडक’च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी जान्हवी कपूरला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरचा हा पहिलाच सिनेमा असल्याने या सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. या सिनेमात जान्हवीसोबत इशान खट्टर हा अभिनेता दिसणार आहे. 

‘धडक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अर्जून कपूरने मागितली जान्हवीची माफी…

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number