जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपुरमध्ये एका अज्ञात व्यक्तीने एक्टीव्हा गाडीच्या डिक्कीमधून 1 लाख 50 हजार रुपयांवर डल्ला मारलाय. चोरीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. चोरीची ही सर्व घटना पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलीय.
रवींद्र कोठोटे हे आपल्या ऑफिसचे पैसे काढण्याकरता बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत गेले. त्यांनी बँकेतून 1 लाख 50 हजार रुपये काढून ॲक्टीव्हा गाडीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर रविंद्र आपल्या मित्राला भेटण्यासाठी जवळीच्या माउंट रोडवरील संझाचुला हॉटेलकडे गेले.
थोड्याच वेळात परत येताच त्यांनी डिक्की उघडून बघितली असता पैसे असलेली पिशवी तिथे दिसलीच नाही. त्यांनी लगेच पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, ही सर्व चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांचा अधित तपास सुरु आहे.