जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपूर महानगर पालिकेकडून चालवण्या जाणाऱ्या आपली बस या परिवहन सेवेतील कंडकंटर्सनी प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु करण्यात आल्याचा स्मार्टच्या माध्यमातून घोटाळा केल्याच उघड झालय.
सर्वसामान्यांना शहरात प्रवासासाठी परिवहन विभागाच्या तोकड्या बसेस आहेत तर दुसरीकडे अडचणीत असलेल्या महापालिकेच्या तिजोरीला या प्रकारामुळे नुकसान होतय.नागपुरातील स्टार बस म्हणजेच आपली बसच्या माध्यमातून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना, नोकरदारांना आणि इतर प्रवाशांच्या सोयीसाठी महापालिकेने स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले आहे.
हे कार्ड रिचार्ज करण्याची सोय आहे पण यातूनच बसच्या कंडक्टर्सनी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याच पुढे आल आहे. खर तर प्रवाशांसाठी असेलले हे स्मार्ट कार्ड साठ कंडक्टर्स कडे आढळून आले आहे त्यामुळे ह्या कार्डच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांचा अपहार होत असल्याच सांगितल जातय.विशेष म्हणजे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी याच शहरातून आहे देशाच्या परिवहन व्यवस्थेला वळण लावण्याचा गडकरी प्रयत्न करत असले तरी त्यांचीच सत्ता असलेल्या पालिकेत हा घोटाळा उघड झाला असून खुद्द परिवहन सभापतींनीच हा घोटाळा उघड केल्याने पालिकेत खळबळ माजली आहे.