Nagpur Cylinder Blast: नागपूर हादरलं! कामठीत सिलेंडरचा भीषण स्फोट; कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, 10 जण जखमी

एका घरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने 40 वर्षीय अतुल उर्फ बंटी पानतावणे यांचा मृत्यू झाला, तर अन्य 10 जण जखमी झाले आहेत.

Nagpur Cylinder Blast: नागपूर हादरलं! कामठीत सिलेंडरचा भीषण स्फोट; कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, 10 जण जखमी

Nagpur Cylinder Blast: नागपुरातून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील कामठी येथील गांधीनगर भाजी मंडी परिसरात रविवारी सकाळी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका घरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने 40 वर्षीय अतुल उर्फ बंटी पानतावणे यांचा मृत्यू झाला, तर अन्य 10 जण जखमी झाले आहेत. गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे.

चहा बनवताना काळाचा घाला
प्राप्त माहितीनुसार, रविवारी सकाळी पानतावणे यांच्या पत्नी चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता गॅस गळतीमुळे अचानक आग भडकली. काही सेकंदातच गॅस सिलेंडरचा कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. आग लागताच अतुल यांच्या पत्नी आणि मुलांनी प्रसंगावधान राखत घराबाहेर धाव घेतली आणि स्वतःचे प्राण वाचवले. मात्र, दुर्दैवाने अतुल पानतावणे हे बेडरूममध्ये अडकले. घराला वेढलेल्या धुरामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. आग विझवण्याच्या प्रयत्नात शेजारील नागरिक आणि कुटुंबातील अन्य सदस्य असे 10 जण होरपळले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लाखोंचे साहित्य खाक; संसार उघड्यावर
या भीषण आगीत पानतावणे कुटुंबाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरातील सोन्याचे दागिने, फ्रिज, टीव्ही आणि जीवनावश्यक वस्तूंसह सुमारे 5 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले होते.

हेही वाचा – Ahilyanagar Heatstroke: अहिल्यानगरमध्ये उकाड्याने घेतला पहिला बळी! शेतात काम करताना महिलेचा दुर्दैवी मृत्यू

तपास आणि मदतीची हाक
जुनी कामठी पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, सर्वस्व गमावलेल्या या कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number