जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपूरच्या नरेंद्र नगर मधील पेट्रोलपंप तीन लोकांनी लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. तोंडावर कपडा बांधून तिघांनी एका कर्माचा-यावर चाकूने हल्ला केला.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वैष्णवी ऑटोमोबाईल्स या पेट्रोल पंपावर ही घटना घडलीय.
इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्याने हे तिघेही घाबरले आणि पेट्रोल पंप लुटण्याचा त्यांचा प्रयत्न फसला.