नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या चोरट्याला नागपूर पोलिसांकडून अटक

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर नोकरीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतल्यानंतर गावातून पसार झालेल्या एकाला चार जणांनी हॉटेलमध्ये शिरून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला आपल्या वाहनात कोंबून ते पळून गेले. गणेशपेठच्या जाधव चौकातील हॉटेल अर्जूनमध्ये ही घटना घडली. अनूप चंद्रकांत मिरगे असे अपह व्यक्तीचे नाव असून, तो वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आहे. हातात नोकरी देण्याचे […]

नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या चोरट्याला  नागपूर पोलिसांकडून अटक

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नोकरीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतल्यानंतर गावातून पसार झालेल्या एकाला चार जणांनी हॉटेलमध्ये शिरून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला आपल्या वाहनात कोंबून ते पळून गेले. गणेशपेठच्या जाधव चौकातील हॉटेल अर्जूनमध्ये ही घटना घडली. अनूप चंद्रकांत मिरगे असे अपह व्यक्तीचे नाव असून, तो वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आहे.

हातात नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याने नागरिकांकडून मोठी रक्कम गोळा केली आणि अनेकांची फसवणूक करून तो पसार झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तो नागपुरात कॉटन मार्केटजवळच्या हॉटेलमध्ये दडून बसल्याची माहिती त्याला रक्कम देणा-यापैकी काहींना मिळाली असता. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास चार आरोपी हॉटेलमध्ये शिरले. त्यानंतर त्यांनी रुम नंबर १०५ मध्ये असलेल्या अनुप मिरगेला बेदम मारहाण केली.

‘नोकरीचे आमिष दाखवून रक्कम घेतो आणि नोकरी लावून देत नाही. पैसेही परत करीत नाही अन् पळून जातो,’ असा आरोप करून त्याला मारतच हॉटेलबाहेर काढले हॉटेलचे व्यवस्थापक, कर्मचारी यांनी आरोपींना रोखण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांना न जुमानता आरोपींनी त्याला आपल्या वाहनात मध्ये बसवून पळवून नेले. अपहरणाच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दिलेल्या माहितीच्या आधारे गणेशपेठ पोलिसांनी रात्रभर ईकडे तिकडे शोधाशोध करून पहाटेच्या वेळी अपहृत मिरगेसह चार संशयीतांना ताब्यात घेतले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number