नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे .या अधिवेशानात महाआघाडीचे अनेक नेते उपस्थित असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या स्नेहभोजनानंतर पत्रकाराशी बोलत असतांना आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं.
काय म्हणाले अजित पवार?
पवार यांनी म्हटलं आदित्य हा बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे.
मात्र आदित्यच्या वागण्यात अजिबात अहंकार नाही.
तो सगळ्याबरोबर मिळून मिसळून राहतो.
विधिमंडळमध्ये उद्धव ठाकरे यांनी आयोजित केल्या स्नेहभोजनाला अनेक आमदार उपस्थित होते. यादरम्यान कुणाचीही काही गैरसोय होऊ नये याची पुरेपूर काळजी आदित्य ठाकरे घेतली होती. सर्व आमदारांना गरमागरम जेवण मिळावं यासाठी आदित्य हे विशेष लक्ष देत असून सर्वांना हवं, काय नको ते विचारपूस करत होते. यामुळे अजित पवारांना आदित्यचा स्वभाव फार भावला.
अजित पवार यांनी आदित्य यांच्या स्वभावाचं कौतुक करतानी त्यांनी म्हटलं ‘आदित्य नवखा आहे. पण सभागृहात सर्वांमध्ये मिळून मिसळून राहतो. जर पार्टीची मीटिंग असली, तर तो वरिष्ठ आले की लगेच त्यांना बसण्यासाठी खुर्ची रिकामी करून देतो.
आदित्यमध्ये यांच्यात ‘मी’ पणा दिसत नाही. ही बाब फार चांगली आहे. अजित पवार यांनीच नाही तर आदित्यचे कौतुक बाकी इतर आमदारांनी सुद्धा केलं आहे. सगळीच तरुण मंडळी चांगली आहेत असंही अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले.