जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
वर्षाच्या शेवटच्या दिवशीही नागपूरमध्ये आणखी एकाची हत्या करण्यात आलीय. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आशीर्वाद नगरमध्ये अबीर दुराई यांची धार दार शास्त्राने भोकसून हत्या केली गेली आणि मृतदेह रस्त्यावर फेकून दिण्यात आला आहे. अबीर दुराई हे इडली संबारवडाची गाडी चालवायचे.
व्यवसायिक वादातून हे हत्याकांड घडले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर दुराई हे मित्रासोबत बाहेर गेले होते. ते घरी परतलेच नाही. पहाटे स्थानिक नागरिकांना रस्त्यावर मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिलीय. या हत्येचा हुडकेश्वर पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र, या हत्येनंतर नागपूर शहरात हत्येची नव्वदी पूर्ण झालीय.