नागपूर हादरले आणखी एका हत्येने

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर नागपूरमधील गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत बोरगाव चौकात शनिवारी रात्री 24 वर्षीय युवकाचा अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे. सारंग केशव मदने असे मृत युवकाचे नाव आहे. या हल्ल्यात सारंग गंभीररीत्या जखमी झाल्याने तो पळून जाऊ शकला नाही. आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. मृत युवक सारंग हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे […]

नागपूर हादरले आणखी एका हत्येने

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपूरमधील गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत बोरगाव चौकात शनिवारी रात्री 24 वर्षीय युवकाचा अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे. सारंग केशव मदने असे मृत युवकाचे नाव आहे. या हल्ल्यात सारंग गंभीररीत्या जखमी झाल्याने तो पळून जाऊ शकला नाही. आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

मृत युवक सारंग हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे पोलीस तपासात समोर आली आहे. हा खून टोळी वैमनस्यातून झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाजवळील दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज गोळा करणे सुरू केले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number