नागपूरच्या नाग नदीच्या सौंदर्यीकरणासाठी जपान देश आर्थिक मदत करणार आहे. नागपूर शहराची ओळख असलेल्या नाग नदीचं नाल्यात रुपांतर झालं आहे.
महापालिका दरवर्षी नाग नदी स्वच्छ करण्याचं सोंग घेते. तात्पुरती स्वच्छता होते खरी मात्र नंतर परिस्थिती जैसे थे…
अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर आता या नदीची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्याचं महापालिकेने ठरवलं आहे.
विशेष म्हणजे यासाठी जपान आर्थिक मदत करणार असून यासाठी जपानची जायका कंपनी बाराशे कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार आहे
या नदीच्या सौंदर्यीकरणासाठी पहिल्या टप्प्याला केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरीही मिळाली आहे.