जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नागपूर -मुंबई दुरांतो एक्स्प्रेस मधून सुरु असलेल्या संशयित हवाला रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. आरपीएफने या छाप्यात 30 लाख रुपये जप्त केलेयेत आणि एका आरोपीला अटक केलीये.
हा पैसा कोणाचा होता आणि कोणाला पाठविला जात होता याचा तपास आता आरपीएफ पोलीस करतायेत. एकीकडे सर्वसमान्यांसाठी उपयुक्त असलेल्या या ट्रेनचा वापर मात्र आता काळ्या कामासाठी होताना दिसतोय.
गेल्या काही दिवसांपासून दुरांतो एक्स्प्रेस मधून हवाला व्यापारी अवैधपणे पैशांची ने-आण करत असल्याची माहिती आरपीएफला मिळाली आणि त्यांनी सापळा रचून या रॅकेटचा पर्दाफाश केला.