जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
रामटेकचे भाजप आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलांना अपशब्द वापरल्या प्रकरणी रेड्डींविरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
भाजप आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांना त्यांच्या कार्यालयात काही महिला एका मायक्रो फायनान्स कंपनीकडून फसवणूक झाल्याचं निवेदन देण्यासाठी या महिला गेल्या होत्या. त्यावेळी महिलांबद्दल रेड्डी यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात येतोय.
दरम्यान, पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल करुन घेतली. या प्रकरणी महिलांनी न्यायालयातही दाद मागण्याचा निर्धार व्यक्त केला.