जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
भाजप आमदार सुधीर पारवे यांनी क्षुल्लक कारणावरुन पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केलीय. पीएसआय अजय गर्जे आणि त्यांच्या पत्नीला आमदार सुधीर पारवे यांनी मारहाण केलीय. पीएसआय गर्जे आपल्या गाडीच्या पंचर झालेला टायर दुरुस्त करत असताना मागून येणाऱ्या सुधीर पारवे यांच्या गाडीला रस्त्यावर असलेला टायर लागला.
या रागातून आमदार सुधीर पारवे यांनी पीएसआय यांना मारहाण केलीय. स्वतःला आणि पत्नीला केलेल्या मारहाणीवरुन गर्जे यांनी या गुंडगर्दी करणाऱ्या भाजप आमदाराविरोधात तक्रार दाखल केली आहे.