नागपुरमध्ये एका मनोरुग्ण व्यक्तीला चोर समजून लोकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपुरच्या कळमेश्वर तालुक्यात ब्राम्हणी फाटा येथे या व्यक्तीला लोकांनी मारहाण केली आहे. नागपुरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या मनोरुग्ण व्यक्तीची हालचाल संशयास्पद वाटत असल्यामुळे नागरिकांना चोर असल्याचा संशय आल्यामुळे जबर मारहाण केली. तुझे आणखी साथीदार कुठे असल्याचे विचारणा करत मारहाण केली. मात्र पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या मनोरुग्ण व्यक्तीची पोलिसांनी सुटका केली.
नागपुरात चोरीच्या घटान वाढत असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
तसेच नागिकांनी दर रात्री चोरांचा शोध घेत आहेत.
त्यातच मनोरुग्ण व्यक्तीची हालचाल संशयास्पद वाटल्याने नागरिकांनी चोर समजून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
तसेच तुझ्याबरोबरचे साथीदार कुठे असल्याचे विचारणा करत त्याला नागरिकांनी मारहाण केली.
कळमेश्वर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.
मात्र पोलिसांना बघून सुद्धा नागरिकांनी मनोरग्णाला मारहाण करण्यास थांबले नाही.
पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून त्याची सुटका केली आणि पोलीस स्थानकात चौकशी केल्यानंतर तो मनोरुग्ण असल्याचे समोर आले.