नागपूरच्या महापौर नंदा जिचकार या स्वत:च्या मुलाला खासगी सचिव (पीए) बनवून विदेश दौऱ्यावर गेल्या आहेत. अमेरिके
मनपा कायद्यात महापौरांना खासगी पीए देण्याची तरतूद नाही. त्यांना स्वत:च्या पातळीवर खासगी पीए ठेवता येतो. मनपा महापौरांना सरकारी पीए देते. मात्र, सॅनफ्रान्सिस्को येथे जाताना महापौरांनी त्यांच्या मुलालाच पीए पदावर दाखविले आहे. आयोजक संस्थेने युनायटेड स्टेटच्या अॅम्बेसीतील कॉन्सुलेट जनरलला व्हिसासाठी माहितीस्तव दिलेल्या पत्रात स्पष्टपणे तसे नमूद केले आहे.
महापौरासारख्या जवाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने अश्या प्रकारचे कृत्य करणे अपेक्षित नसून पक्षाने त्याचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सामन्य नागरिकांनी केली आहे, तर भाजप नगरसेवक प्रमोद चिखल यांनी महापौरांच्या कृतीचं समर्थन केलं आहे.