Nagpur crime: नागपूर हादरलं! मैत्रीचे प्रेमात रूपांतर करून लग्नाचे खोटे आमिष; अल्पवयीन मुलीवर 3 वर्ष सतत अत्याचार

नागपुरात 12वीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लग्नाचे आमिष दाखवून ३ वर्ष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड.

Nagpur crime: नागपूर हादरलं! मैत्रीचे प्रेमात रूपांतर करून लग्नाचे खोटे आमिष; अल्पवयीन मुलीवर 3 वर्ष सतत अत्याचार

नागपूर: उपराजधानी नागपुरातून नात्याला आणि संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 20 वर्षीय नराधमाने 17 वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून वासनेची शिकार बनवल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलगी अचानक गरोदर राहिल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीला मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

इयत्ता 9 वीत असताना झाली ओळख

मिळालेल्या माहितीनुसार, विवान खांडेकर (वय 20 वर्षे, रा. मानकापूर) असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. विवान हा आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वीही मारामारीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पीडित मुलगी आणि आरोपी विवान यांची ओळख ती इयत्ता 9 वीत असताना, म्हणजेच सुमारे तीन वर्षांपूर्वी झाली होती. सुरुवातीला त्यांच्यात साधी मैत्री झाली. मात्र, विवानने हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात केले. ‘मी तुझ्याशीच लग्न करेन आणि मला चांगली नोकरी लागली की आपण सुखाचा संसार करू’, अशी गोड स्वप्ने त्याने मुलीला दाखवली.

हेही वाचा: Raigad ST Driver Viral Video: मुंबई-गोवा महामार्गावर थरार; कार आडवी लावून ST चालकाला भररस्त्यात बेदम मारहाण

विश्वासघाताने उद्ध्वस्त केलं आयुष्य

सध्या ही पीडित मुलगी इयत्ता 12वीत शिकत आहे. आरोपीने तिच्या निरागसतेचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली. घरात कोणी नसताना आरोपीने पीडितेच्या राहत्या घरीच तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले. एवढेच नव्हे तर, त्याने तिला गोरेवाडा परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये नेऊनही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. विवानच्या या सततच्या अमानुष कृत्यामुळे पीडितेचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

अशी उघड झाली नराधमाची करामत

गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीची प्रकृती अचानक बिघडली. तिची शारीरिक स्थिती खालावत चालल्याचे पाहून कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी तातडीने तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, ती गरोदर असल्याचे निदान झाले. हा वैद्यकीय अहवाल पाहताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. धक्का बसलेल्या पालकांनी जेव्हा मुलीला प्रेमाने विश्वासात घेऊन विचारणा केली, तेव्हा तिने रडत रडत गेल्या तीन वर्षांपासून विवानने केलेल्या छळाची आणि अत्याचाराची संपूर्ण कहाणी सांगितली.

हेही वाचा: Rohini Paradhye Death Case: ‘चिमणे, परत ये गं…’ रोहिणीच्या पतीची भावनिक पोस्ट; मात्र सोशल मीडियावर वेगळंच चित्र, नेटकऱ्यांना नेमकं काय खटकलं?

पोलिसांची तत्परता; आरोपी विवान गजाआड

घडलेला सर्व प्रकार अत्यंत गंभीर असल्याने मुलीच्या नातेवाईकांनी क्षणाचाही विलंब न करता थेट मानकापूर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ पावले उचलली आणि नराधम विवान खांडेकर याला बेड्या ठोकल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number