जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपूर जिल्हापरिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धे आयोजन करण्यात आलं होत. या संपूर्ण स्पर्धे दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना चक्क बाथरुमचं पाणी पाजण्यात आलंय. 23 आणि 24 फेब्रुवारीदरम्यान नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळेत क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं गेल होतं.
यावेळी जेवणाचं कंत्राट सभापतींच्या भावाला देण्यात आलं होतं. त्यावेळी तिथे आलेल्या लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्याऐवजी चक्क बाथरुमचं अस्वच्छ पाणी देण्यात येत होतं. त्यामुळे अशा कार्यक्रमांत हजेरी लावण आणि विद्यार्थ्यांनी त्यात सहभागी होण हे आता जीवावर बेतन्यासारख झालं आहे.
यासंदर्भातला एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शिक्षक संघटनांनी यासंदर्भात कारवाईची मागणी केलीय. तरीहूी एवढा निर्लज्जपणा येतो कुठून? असा प्रश्न निर्माण होतो. आता प्रशासन याकडे कशा प्रकारे लक्ष देतय हे पहान गरजेच ठरेल.