Nagpur Rain: नागपूरमध्ये पुन्हा पावसाचा कहर? मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, संध्याकाळी 5 नंतर …

नागपूरमध्ये विक्रमी पावसानंतर पुन्हा संध्याकाळी मुसळधार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Nagpur Rain: नागपूरमध्ये पुन्हा पावसाचा कहर? मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, संध्याकाळी 5 नंतर …

नागपूर: नागपूरमध्ये झालेल्या विक्रमी पावसानंतर शहरातील परिस्थिती अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेली नसतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आणखी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज संध्याकाळी पाचनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मागील 24 तासांत नागपूरमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक सखल भाग जलमय झाले. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, तर काही भागांमध्ये घरांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. अल्पावधीत मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.

हेही वाचा: E Pik Pahani Update: सर्व्हर डाऊन अन् नेटवर्कच्या अडचणींवर अखेर तोडगा; ई-पीक पाहणीबाबत सरकारने केला 'हा' मोठा बदल

परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध भागांना भेट दिली. त्यांनी प्रशासनाच्या बचाव आणि मदतकार्याचे कौतुक करत अशा प्रकारचा विक्रमी पाऊस काही तासांत झाल्यास कोणत्याही यंत्रणेसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते, असे सांगितले. तरीही आपत्ती व्यवस्थापन, महापालिका आणि बचाव पथकांनी तत्परतेने काम करून अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, हवामान खात्याने 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

या कालावधीत नदी-नाले दुथडी भरून वाहण्याची, सखल भागात पाणी साचण्याची आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर दरड कोसळण्याचाही धोका लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Monsoon Update : ऑगस्ट महिन्यात पावसाचा लपंडाव? 'एल निनो'चे संकट गडद; मान्सून ब्रेकमुळे चिंता वाढण्याची शक्यता

मुंबई महानगर प्रदेशासह रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्येही पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांनी तसेच घाटमार्गाने प्रवास करणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रशासनाने नागरिकांना हवामान खात्याच्या अधिकृत सूचना नियमितपणे तपासण्याचे, पूरग्रस्त किंवा सखल भागात जाणे टाळण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सतर्कता आणि योग्य खबरदारी घेतल्यास संभाव्य धोके टाळता येऊ शकतात, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number