जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
नागपुरात जमावाकडून मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्याकडे गोमांसच असल्याचं निष्पन्न झालं आहे.
एफएसएलच्या अहवालात ही माहिती समोर आली. सलीम इस्माइल शाह यांना नागपुरातील भारसिंगीमध्ये 12 जुलै रोजी गोमांस बाळगल्याच्या कारणावरुन जमावाने बेदम
मारहाण केली होती.
त्यानंतर शाह यांनी गोमांस नसल्याचा दावा केला होता. मात्र फॉरेन्सिक अहवालात कार्यकर्त्याचं बिंग फुटल आहे.