जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपूरच्या शासकीय महिला बालसुधारगृहातून 4 मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलींनी सुधार गृहाची खिडकी तोडून पलायन केल्याची माहिती मिळाली.
अंधाराचा फायदा घेत या मुलींनी सुधारगृहातून पळ काढला. बालसुधार गृहात सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यानं असे प्रकार घडतात.
एकीकडे नागपूरमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असताना आता असे प्रकारही घडू लागल्यानं प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे.