नागपूरमध्ये धावणार डबल डेकर मेट्रो

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर   देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पाठोपाठ महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये मेट्रो रेल्वे धावणार आहे. त्यातही तिचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य ठरणार आहे. चार किलोमीटरचा दुमजली पूल उभारण्यात येत असून हा पूल नागपूरच्या सौदर्यात भर घालणार आहे. मेट्रो, नॅशनल हायवे आणि साधारण रस्ता असा चार किलोमीटरचा डबल डेकर ब्रिज नागपूरच्या वर्धा रोडवर साकारतोय. […]

नागपूरमध्ये धावणार डबल डेकर मेट्रो

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पाठोपाठ महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये मेट्रो रेल्वे धावणार आहे. त्यातही तिचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य ठरणार आहे.

चार किलोमीटरचा दुमजली पूल उभारण्यात येत असून हा पूल नागपूरच्या सौदर्यात भर घालणार आहे. मेट्रो, नॅशनल हायवे आणि साधारण रस्ता असा चार किलोमीटरचा डबल डेकर ब्रिज नागपूरच्या वर्धा रोडवर साकारतोय. यासाठी 430 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

नागपूर मेट्रोचे काम जलद गतीने सुरू आहे. 5.8 किमी अंतराच्या पहिल्या टप्प्यात मेट्रो लवकरच धावणार आहे त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

या मार्गावरची स्टेशनदेखील उभी रहातायत. शिवाय दोन डबलडेकर पूल नागपुरात साकारताहेत. आश्चर्य म्हणजे या पुलाची रुंदी ही सहा पदरी रस्त्याएवढी असेल आणि त्याची रुंदी 20 मीटर एवढी आहे. महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन आणि नॅशनल हायवे अथोरिटीच्या वतीने या दोन्ही पुलांचा खर्च उचलण्यात आलाय. वरच्या पुलावरून मेट्रो तर खालून पुलावरून गाड्यांची वाहतूक. होणार असल्याने मोठ्या प्रमाणात जागेची आणि पैशांची सुद्धा बचत होणार आहे .

या वैशिष्ट्यपूर्ण मेट्रोच्या पुलामुळे नागपूरकरांची वाहतूक कोंडीपासून मुक्तता तर होईलच मात्र सोबतच जागेचे सुद्धा योग्य नियोजन होईल. मेट्रो, वाहतूक ओव्हर ब्रिज आणि जमिनीवरची वाहतूक असा सगळं एकाच जागेवरून होणार असल्याने हा एक ऐतिहासिक असा ओव्हर ब्रिज असेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number