शवविच्छेदनासाठी आलेला मृतदेह उंदरांनी कुरतडला

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर शवविच्छेदनासाठी आलेला मृतदेह चक्क उदंरांनी कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आला आहे.   मधूकर टेंभूर या मृत व्यक्तीचा देह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला होता. त्यावेळी मृत व्यक्तीचा चेहरा उंदिरांनी कुरतडल्याचं आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला आहे. यासंबंधी मृताच्या नातेवाईकांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार […]

शवविच्छेदनासाठी आलेला मृतदेह उंदरांनी कुरतडला

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

शवविच्छेदनासाठी आलेला मृतदेह चक्क उदंरांनी कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आला आहे.

 

मधूकर टेंभूर या मृत व्यक्तीचा देह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला होता.

त्यावेळी मृत व्यक्तीचा चेहरा उंदिरांनी कुरतडल्याचं आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला आहे. यासंबंधी मृताच्या नातेवाईकांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार देखील केली.

मात्र, या सर्वप्रकारबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. या  प्रकारामुळे इंदिरा गांधी वैद्यकिय महाविद्यालयाचा गलथानपणा समोर आला आहे. 

 

मृतदेह कुरतडल्याप्रकरणी चौकशी होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली. जय महाराष्ट्रने याबबातचे वृत्त दाखवले होते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number