नाफेड ३२ कांदा खरेदी केंद्र सुरू करणार

नाशिक, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून २४१० रुपये प्रति क्विंटल दराने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. आता त्यापुढची घोषणा महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाफेड नाशिक जिल्ह्यात ३२ कांदा खरेदी केंद्र सुरू करणार आहे. या केंद्रांच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जाईल, असे भुजबळ […]

नाफेड ३२ कांदा खरेदी केंद्र सुरू करणार

नाशिक, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून २४१० रुपये प्रति क्विंटल दराने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. आता त्यापुढची घोषणा महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाफेड नाशिक जिल्ह्यात ३२ कांदा खरेदी केंद्र सुरू करणार आहे. या केंद्रांच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जाईल, असे भुजबळ म्हणाले.

नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांच्या पातळीवर बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरू आहे. ही खरेदी प्रामुख्याने २१०० ते २२०० रुपये दराने सुरू असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. शेतकऱ्यांचे नुकसान कमी व्हावे यासाठी केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार आहे, असे भुजबळांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number