US Scientist Died: अमेरिकेत अणुशास्त्रज्ञांच्या गूढ मृत्यूने खळबळ; पाच शास्त्रज्ञ आढळले मृतावस्थेत

अमेरिकेत 2023 पासून अंतराळ, अणुशक्ती आणि संरक्षण संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या मृत्यू किंवा बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.

US Scientist Died: अमेरिकेत अणुशास्त्रज्ञांच्या गूढ मृत्यूने खळबळ; पाच शास्त्रज्ञ आढळले मृतावस्थेत

अमेरिकेत 2023 पासून आतापर्यंत किमान पाच शास्त्रज्ञ मृतावस्थेत आढळले किंवा बेपत्ता झाल्याच्या घटनांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या सर्व घटनांमध्ये अंतराळ, संरक्षण, अणुशक्ती आणि लष्करी संशोधनाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे. आता अलाबामातील संशोधक एमी एस्क्रिज यांच्या मृत्यूचीही पुन्हा चर्चा सुरू झाली असून त्यांना या 2023 पासूनच्या यादीतील 11वे प्रकरण मानले जात आहे.

एमी एस्क्रिज या 34 वर्षीय संशोधकाचा 2022 मध्ये मृत्यू झाला होता. अधिकृत माहितीनुसार, त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत फारशी अधिकृत माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. एमी एस्क्रिज या “अँटी-ग्रॅव्हिटी” आणि प्रायोगिक प्रोपल्शन तंत्रज्ञानावर काम करत होत्या. त्यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता.

हेही वाचा: Sahar Shaikh: बेपत्ता युनूस शेख पोलिसांसमोर हजर, नोंदवला जबाब; MIM नगरसेविका सहर शेख अद्याप बेपत्ताच

या घटनांमध्ये नासा, एमआयटी, कॅलटेक, लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी आणि अमेरिकन वायुसेनेशी संबंधित अनेक व्यक्तींचा समावेश आहे. काहींचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला, तर काहीजण अचानक बेपत्ता झाले. माजी वायुसेना अधिकारी विल्यम नील मॅककॅसलँड, नासा अभियंता मोनिका रेझा, एमआयटीचे नुनो लॉरेरो आणि कॅलटेकचे कार्ल ग्रिलमायर यांसारखी नावे या यादीत आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणाला “गंभीर” म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी नुकतीच या विषयावर बैठक घेतली असून पुढील काही दिवसांत अधिक माहिती समोर येईल. ट्रम्प यांनी “ही सर्व प्रकरणे केवळ योगायोग असावीत अशी आशा आहे, पण आम्ही याचा तपास करणार आहोत,” असे म्हटले आहे.

व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनीही या सर्व घटनांचा FBI आणि इतर यंत्रणांच्या मदतीने एकत्रित तपास केला जात असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत कोणताही अधिकृत संबंध सिद्ध झालेला नसला, तरी या सर्व व्यक्ती संवेदनशील संशोधन क्षेत्रांशी जोडलेल्या असल्यामुळे संशय आणि चर्चांना अधिक खतपाणी मिळत आहे. 

हेही वाचा: Iran US War: निर्बंध न उठवल्यास होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहणार नाही; ट्रम्प यांचे ‘ते’ सात दावे खोटे ठरवत इराणने अमेरिकेला सुनावलं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number