‘मविआ सरकार येताच कारवाई करणार’

मुंबई मनपाच्या मुख्यालयावर ठाकरे गटाने मोर्चा काढला. दरम्यान, या मोर्च्याला सम्बोधीत करत असताना आदित्य ठाकरे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. ठाकरे गटाच्या या मोर्च्यात खोके सरकारकडून मुंबई ताब्यात घेण्यासाठी माजी नगरसेवक फोडले जात आहेत. यासाठी आता आयपीएस अधिकाऱ्यांकडून फोन केले जात आहेत. याचे काही रेकॉर्डिंग माझ्याजवळ आहेत. लवकरच ते उघड करेन”, असा खळबळजनक आरोप आदित्य […]

‘मविआ सरकार येताच कारवाई करणार’

मुंबई मनपाच्या मुख्यालयावर ठाकरे गटाने मोर्चा काढला. दरम्यान, या मोर्च्याला सम्बोधीत करत असताना आदित्य ठाकरे यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

ठाकरे गटाच्या या मोर्च्यात खोके सरकारकडून मुंबई ताब्यात घेण्यासाठी माजी नगरसेवक फोडले जात आहेत. यासाठी आता आयपीएस अधिकाऱ्यांकडून फोन केले जात आहेत. याचे काही रेकॉर्डिंग माझ्याजवळ आहेत. लवकरच ते उघड करेन”, असा खळबळजनक आरोप आदित्य ठाकरे यानी केला आहे. आदित्य यांनी यावेळी मुंबई मनपामध्ये झालेल्या घोटाळ्यांचा पाढा वाचला.

“पहिला घोटाळा म्हणजे रस्त्यांचा घोटाळा होता. तो सर्वांना कळला पाहिजे. कारण तुमच्या आमच्या सर्वांच्या पैशांचा गैरवापर झाला आहे. तुम्ही निवेदन वगैरे देणार आहात का असं मला विचारतात. मी म्हणालो चोराना काय निवेदन द्यायचे. तुम्ही जी चोरी केलीय ती आमच्या नजरेत आलीय. ज्या दिवशी आमचे सरकार आले त्या दिवशी पोलीस आणि आम्ही आत घुसणार आणि अटक करणार, लक्षात ठेवा”, असा उघड इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number