व्हिडिओ शेअर केला आणि आयुष्य संपवलं

मुंबई ,२९ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : अलीकडच्या काळात सिनेसृष्टीत बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आता एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरने स्वतःचे आयुष्य संपवले आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मुस्कान नारंग या फॅशन डिझायनरने आत्महत्या केली आहे. View this post on Instagram A post shared by Muskan Narang (@muskan_narang99) मुस्कान […]

व्हिडिओ शेअर केला आणि आयुष्य संपवलं

मुंबई ,२९ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : अलीकडच्या काळात सिनेसृष्टीत बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आता एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरने स्वतःचे आयुष्य संपवले आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मुस्कान नारंग या फॅशन डिझायनरने आत्महत्या केली आहे.

मुस्कान नारंग ही फॅशन डिझायनर आहे. काही दिवसांपूर्वी मुस्कान मुंबईहून गावी आई-वडिलांकडे गेली होती. तिथेच तिने स्वतःचा जीव संपवला. गावी . यात अजब बाब म्हणजे स्वतःला संपवण्यापू्र्वी मुस्कान हिने शेवटचा व्हिडीओ पोस्ट केला होता. यात तिने स्वतःला संपवत असल्याच कबुली दिली. सध्या समाज मुस्कानचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली,”आज माझा हा शेवटचा व्हिडीओ असणार आहे. कदाचित या व्हिडीओनंतर तुम्हाला मी कधीच दिसणार नाही. लोक मला म्हणतात आपल्या अडचणी शेअर कराव्यात पण त्या शेअर करून ही कोणी मला समजून घेतले नाही. त्यामुळे आज मी जे करत आहेते माझ्या मर्जीने करत आहे. यामध्ये कोणाचाही समावेश नाही. त्यामुळे कोणावरही आरोप करू नका.” मुस्कानची ही पोस्ट पाहून सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number