शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात घुसून हत्या

यवतमाळ जिल्ह्यातील भांबराजा येथील शिवसेना पदाधिकारी सुनील डिवरे यांची राहत्या घरी निघ्रृण हत्या करण्यात आली. आधी डिवरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला नंतर कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. तीन अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून डिवरेंवर आधी गोळ्या झाडल्या त्यानंतर धारदार शस्त्राने सुनील डिवरे यांच्यावर वार केले. सुनील डिवरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा […]

शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात घुसून हत्या

यवतमाळ जिल्ह्यातील भांबराजा येथील शिवसेना पदाधिकारी सुनील डिवरे यांची राहत्या घरी निघ्रृण हत्या करण्यात आली. आधी डिवरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला नंतर कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. तीन अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून डिवरेंवर आधी गोळ्या झाडल्या त्यानंतर धारदार शस्त्राने सुनील डिवरे यांच्यावर वार केले.

सुनील डिवरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने डिवरे यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधी डॉक्टरांनी त्यांना मृत जाहीर केले.

शिवसेनेचे पदाधिकारी सुनील डिवरे यांच्या हत्येनंतर भांबराजा गावकरी संतप्त झाले आहेत. या नागरिकांनी नागपूर-तुळजापूर मार्गावर गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनक सुरू केले तसेच यादरम्यान टायरची जाळपोळसुद्धा करण्यात आली. तसेच याप्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

सुनील डिवरे हे यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. शिवाय ते भांबराजा ग्रामपंचायतमध्ये संरपंच होते. सुनील डिवेर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण यवतमाळ हादरले असून याप्रकरमी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number