पुणे, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : कौटुंबिक वादातून महिलेवर पतीने चाकूने वार केल्याची घटना खराडी भागात घडली. महिलेची हत्या करून पती स्वत:च चंदननगर पोलीस ठाण्यात हजर झाला.
लक्ष्मी केशव सीताफळे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीचा पती केशव भीमराव सीताफळे याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी आणि पती केशव यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाले होते. केशवने पत्नीला शिवीगाळ करुन तिचा गळा चाकूने चिरला. पत्नीची हत्या करून तो पोलीस ठाण्यात हजर झाला. हत्येमागचे निश्चित कारण समजले नसून, प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून पतीने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.