नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक घटना, साडूने केली साडूची हत्या

नाशिक, १६ ऑगस्ट, २०२३ प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील सूर्यगड येथील माजी सरपंच मनोहर राऊत (४५) यांची हत्या त्यांच्याच साडूने केली. कुऱ्हाड वापरून ही हत्या करण्यात आली. या हल्ल्यात राऊत यांची पत्नी आणि हल्लेखोराची पत्नी पण जखमी झाली. भास्कर जाधव आणि माजी सरपंच मनोहर राऊत हे सख्खे साडू होते. भास्कर जाधव हा पळसन तालुक्यातील पायरपाडा येथील […]

नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक घटना, साडूने केली साडूची हत्या

नाशिक, १६ ऑगस्ट, २०२३ प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील सूर्यगड येथील माजी सरपंच मनोहर राऊत (४५) यांची हत्या त्यांच्याच साडूने केली. कुऱ्हाड वापरून ही हत्या करण्यात आली. या हल्ल्यात राऊत यांची पत्नी आणि हल्लेखोराची पत्नी पण जखमी झाली.

भास्कर जाधव आणि माजी सरपंच मनोहर राऊत हे सख्खे साडू होते. भास्कर जाधव हा पळसन तालुक्यातील पायरपाडा येथील रहिवासी आहे. तो पत्नी मंदा आणि मुलगा सुरेश यांच्यासह मागील सहा महिन्यांपासून राऊत यांच्या घरी वास्तव्यास होता. आज पहाटेच्या सुमारास भास्कर जाधवने सर्वजण गाढ झोपेत असताना धारदार कुऱ्हाडीने माजी सरपंच मनोहर राऊत यांच्या मानेवर घाव घातला. या हल्ल्यात मनोहर राऊत यांचा मृत्यू झाला. यानंतर भास्कर जाधवने माजी सरपंच मनोहर राऊत यांच्या पत्नीला आणि स्वतःच्या पत्नीला कुऱ्हाडीचे वार करून जखमी केले.

आरडाओरडा ऐकून भास्करचा मुलगा सुरेश याने धाव घेत वडिलांना पकडून बांधून ठेवले. स्थानिकांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन भास्कर जाधव याला अटक केले आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला. माजी सरपंच मनोहर राऊत यांची पत्नी भारती राऊत आणि भास्करची पत्नी मंदा या दोघींना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

गावातून हकालपट्टी

भास्कर जाधव आणि त्याच्या कुटुंबाची काही महिन्यांपूर्वी गावातून हकालपट्टी झाली होती. हकालपट्टी झाल्यापासून भास्कर त्याच्या पत्नी आणि मुलासोबत माजी सरपंच मनोहर राऊत यांच्या घरी वास्तव्यास होता अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number