सुपरवाझरमुळे हक्काचा पगार मिळत नाही म्हणून चार तरुणांनी सुपरवाझरची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण मध्ये घडली आहे. मयत तरुणाच्या शेवटच्या कॉल रेकॉर्डिंगमुळे पोलीस मारेकरी पर्यंत पोहचले आणि हत्येचा उलगडा झाला आहे.कल्याणच्या पश्चिमेकडील खडकपाडा येथे राहणार हर्षद श्रीरंग दुगड हा एका खासगी कंपनीच्या शाखेत सुपरवायझरचे काम करत होता. 3 ऑगस्ट रोजी हर्षदच्या कुटुंबीयांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात हर्षद बेपत्ता असल्याची तक्रार केली होती.
कल्याणच्या पश्चिमेकडील खडकपाडा येथे राहणार हर्षद श्रीरंग दुगड हा एका खासगी कंपनीच्या शाखेत सुपरवायझरचे काम करत होता. 3 ऑगस्ट रोजी हर्षदच्या कुटुंबीयांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात हर्षद बेपत्ता असल्याची तक्रार केली होती.तक्रारी सोबत कुटुंबीयांनी पोलिसना एक कॉल रेकॉर्डिंग दिली या रेकॉर्डिंग मध्ये हर्षद गोपी गोपी ओरडत होता.त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला.
खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू केला हर्षद गोपी नावाच्या कामगारासोबत फिरताना दिसला होता .पोलिसांनी गोपीचा शोध सुरू केला. मुंबई ,ठाणे ,नाशिक ,जालना या शहरात पोलिसांनी गोपीचा शोध घेतला तसेच हर्षदचा शोध सुद्धा सुरू होता. कॉल रेकॉर्डिंगमुळे पोलिसांना हर्षदची हत्या केली असावी त्याचा मृतदेह वाडेघर परिसरात टाकला असावा असा संशय होता त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला.
वाडेघर परिसरात फिरत असताना डम्पिंग ग्राउंड परिसरात पोलिसांना हर्षदची चप्पल सापडली त्या आधारे अखेर डम्पिंग ग्राउंड येथे हर्षदचा शोध सूरु केला. अखेर येथील नाल्यात हर्षद चा मृतदेह आढळला हर्षद चा मृतदेह नाल्यात टाकून त्याच्यावर दगड व कचरा टाकण्यात आला होता.
या दरम्यान पोलिसांनी गोपीचंद घुले ,दशरथ साबळे या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांनी हर्षद ची हत्या केल्याची कबुली दिली आहे. गोपी याने बहाणा करत हर्षदला एका ठिकाणी घेऊन गेला. त्याठिकाणी गोपी आणि दशरथ याने आपल्या दोन अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने हर्षदची हत्या करत त्याचा मृतदेह नाल्यात टाकला कुणाला संशय येऊ नये म्हणून त्या मृतदेहावर दगड आणि कचरा टाकला.
कल्याणच्या वाडेघर परिसरातील एका खासगी कंपनीच्या कार्यलयात हर्षद सुपरवायझर म्हनून काम करत होता त्या ठिकाणी गोपी एका गाडीवर ड्रायवर म्हणून काम करत होता तर दशरथ हेल्पर होता. हर्षद यांच्या सांगण्यावरून ठेकेदाराने गोपी आणि दशरथचे सहा हजार रुपये थकवले होते. त्याचा राग मनात धरून या दोघांनी आपल्या अल्पवयीन दोन साथीदारांच्या मदतीने हर्षदची हत्या केली.