घरात शिरलेल्या मांजराला फेकल्याचा जाब विचारल्यानं महिलेची हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड   मांजराला बाहेर फेकल्याचा जाब विचारल्याने महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. हत्येप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.   प्रभा रंगपिसे या महिलेची मांजर शेजारी राहणाऱ्या साळवे कुटुंबाच्या घरात गेली. साळवेंनी ती मांजर बाहेर फेकली. मांजर बाहेर फेकल्याचा जाब विचारला असता साळवेंनी प्रभा यांच्याशी भांडण केलं. या भांडणाचं रुपांतर […]

घरात शिरलेल्या मांजराला फेकल्याचा जाब विचारल्यानं महिलेची हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड

 

मांजराला बाहेर फेकल्याचा जाब विचारल्याने महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. हत्येप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

 

प्रभा रंगपिसे या महिलेची मांजर शेजारी राहणाऱ्या साळवे कुटुंबाच्या घरात गेली. साळवेंनी ती मांजर बाहेर फेकली. मांजर बाहेर फेकल्याचा जाब विचारला असता साळवेंनी प्रभा यांच्याशी भांडण केलं. या भांडणाचं रुपांतर मारामारीत झालं.

 

मारहाणीमुळे जबरदस्त जखमी झालेल्या प्रभा यांचा यात मृत्यू झाला. साळवे आणि रंगपिसे कुटुंबामध्ये आधीपासूनच भांडण असल्याचं समोर येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number