नोकरीसाठी बनले मुन्नाभाई !

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   ऑनलाईन परीक्षेत हायटेक साधनांचा वापर करत परीक्षार्थींना उत्तरं सांगणाऱ्या रॅकेटचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केलाय. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून या टोळीचा मुख्य सुत्रधार अर्जुन घुसिंगे मात्र फरार आहे. महावीजनिर्मिती कंपनीतर्फे रविवारी लिपिक पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत मेरीटमध्ये उत्तीर्ण व्हायचं असल्यास उमेदवारांकडून सात ते आठ लाख […]

नोकरीसाठी बनले मुन्नाभाई !

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

ऑनलाईन परीक्षेत हायटेक साधनांचा वापर करत परीक्षार्थींना उत्तरं सांगणाऱ्या रॅकेटचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केलाय.

याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून या टोळीचा मुख्य सुत्रधार अर्जुन घुसिंगे मात्र फरार आहे.

महावीजनिर्मिती कंपनीतर्फे रविवारी लिपिक पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत मेरीटमध्ये उत्तीर्ण व्हायचं असल्यास उमेदवारांकडून सात ते आठ लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

यातली अर्धी रक्कम एडवान्स तर उर्वरीत परीक्षेच्या निकालानंतर देणं असा व्यवहार होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून तीन जणांना अटक केलीय.

तर, मुख्य आरोपी मात्र फरार झालाय.अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी मायक्रो इअरफोन, ब्ल्यू ट्यूथ आणि मोबाईल अशी हायटेक साधनंही पोलिसांनी जप्त केलीत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number