समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ

मुंबई, १७ मे २०२३, प्रतिनिधी : कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोन वर्षापूर्वी क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने मॉडेल मुनमुन धमेचा हिला अटक केली होती. त्यामुळे तिच्यावर बरीच चर्चा झाली. दरम्यान ती […]

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ

मुंबई, १७ मे २०२३, प्रतिनिधी : कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दोन वर्षापूर्वी क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने मॉडेल मुनमुन धमेचा हिला अटक केली होती. त्यामुळे तिच्यावर बरीच चर्चा झाली. दरम्यान ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता मॉडेल मुनमुन धमेचा हिने वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

मुनमुन धमेचाने दिलेल्या माहितीनुसार ती इतके दिवस भीतीपोटी गप्प बसली होती. पण आता सीबीआयने वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने सत्य बाहेर येईल अशी तिला आशा आहे. या वेळी तिने सांगितले की,”प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यासारख्या अनेकांना खोट्या प्रकरणात अडकवले आहे.” असे ती म्हणाली. पुढे तिने वानखेंडेंवर आणखी टीका करण्यास सुरुवात केली. ती म्हणाली,” प्रसार माध्यमे त्यांच्या कारवाईला दाद देतात हे त्यांना माहित होते म्हणूनच त्यांनी सातत्याने मॉडेल्स आणि सेलिब्रेटींवर निशाणा साधला. मुनमुनच्या या आरोपांचा वानखेडेंवर परिणाम होणार का आता या कडे सगळ्यांच्या नजरा आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number