जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोला भीषण आग लागली होती.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोला भीषण आग लागली आहे. मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने आग सर्वत्र पसरू लागली आहे. बारा तास उलटून गेल्यानंतरही ही आग आटोक्यात आलेली नाही. ही आग आटोक्यात आणण्यासाठी आग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग सतत भडकत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचण येत आहे.
आगीच्या धुरामुळे मोशी परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकलेलं नाही. बारा तास उलटून गेल्यानंतरही आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरूचं आहे.