‘ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका सज्ज’ – किशोरी पेडणेकर

कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने भारतात शिरकाव केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका सज्ज झाली असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहेत. देशात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापौरांनी केली आहे. तसेच प्रत्येकाने लसीकरण करणे आवश्यक […]

‘ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका सज्ज’ – किशोरी पेडणेकर

कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने भारतात शिरकाव केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका सज्ज झाली असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहेत. देशात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापौरांनी केली आहे. तसेच प्रत्येकाने लसीकरण करणे आवश्यक असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.

ओमायक्रॉनचे वाढते संकट लक्षात घेता विषाणूला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ऍक्शन प्लान तयार केला आहे. तसेच हाय रिस्क देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे. ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी महानगरपालिका सतर्क झाली असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. तसेच ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करून प्रत्येकाने लसीकरण करणे आवश्यक असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number