जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानभवनात पाहायला मिळाले. सत्ताधारी भाजपचे आमदार विधान भवनाच्या पाऱ्यावरती मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी
घोषणा दिल्या.
तर, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांनी मराठा क्रांती मोर्चाच्या टोप्या घालून विधानभवनात प्रवेश केला.
तसेच काँग्रेस मराठा आरक्षणावर राजकारण करत असल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी करत गोंधळ घातला.