जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात ऊस दरासंदर्भात आंदोलन सुरू असताना पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर दानवे यांनी शेतकऱ्यांच्या पायावर गोळीबार करायला हवा होता असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर आज धनंजय मुंडेंनी दानवेंच्या त्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतलाय.
आता दानवेंच्याच बुडावर गोळी मारण्याची वेळ आली असल्याचं सांगून दानवेंच्या कारभारावर मुंडेंनी ताशेरे ओढलेत.