जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्य सरकारची कृषी संजीवनी योजना ही शेतक-यांना संजीवनी देणारी नव्हे तर कृषी वसुली योजना असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
या योजनेच्या नावाखाली सरकार 6 हजार 500 कोटी रुपयांची वसुली करीत असल्याने या योजनेचा फेरआढावा घेण्याची मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले.