Fake Lockdown Post: आधी लॉकडाऊनची अफवा, नंतर माफीनामा; मुंब्य्रातील तरुणाची पोलिसांनी चांगलीच जिरवली

चौकशीनंतर त्याच्याकडून माफी मागणारा व्हिडिओ तयार करून घेतला असून नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Fake Lockdown Post: आधी लॉकडाऊनची अफवा, नंतर माफीनामा; मुंब्य्रातील तरुणाची पोलिसांनी चांगलीच जिरवली

ठाणे: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहेत. या अफवांवर आता पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली असून ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून एक महत्त्वाची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करून भारतात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याची खोटी माहिती पसरवली होती. या व्हिडिओमध्ये तो तरुण “रात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होणार आहे, मात्र तो किती दिवस राहील हे सांगता येणार नाही,” असे सांगताना दिसत होता.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी तत्काळ दखल घेत संबंधित तरुणाचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर पोलिसांनी त्याच्याकडून माफी मागणारा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला, ज्यामध्ये त्याने आपण दिलेली माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे कबूल केले.

हेही वाचा: Pumpkin Halwa: सोपी रेसिपी, भन्नाट टेस्ट! घरच्या घरी बनवा भोपळ्याचा हलवा; जाणून घ्या सोपी पद्धत

माफी मागताना त्या तरुणाने, “मी दिलेली माहिती चुकीची होती. मी जनतेची दिशाभूल केली, त्याबद्दल मी माफी मागतो,” असे स्पष्टपणे सांगितले. या घटनेची माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी दिली आहे. 

या कारवाईद्वारे पोलिसांनी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांना इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर कठोर कारवाई केली जाईल.

दरम्यान, नागरिकांनी कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: Electricity Cut In Mahabaleshwar: पर्यटकांच्या नंदनवनात अंधाराचं साम्राज्य! महाबळेश्वर पालिकेची वीज कापली, नेमकं कारण काय?

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number