Mumbai Water Cut: धो-धो पाऊस पडूनही मुंबईकरांवर पाणीसंकट; काही भागांत 25 टक्के पाणीकपातीची शक्यता

मुंबईतील काही भागांमध्ये 25 टक्के पाणीकपात होण्याची शक्यता आहे.

Mumbai Water Cut: धो-धो पाऊस पडूनही मुंबईकरांवर पाणीसंकट; काही भागांत 25 टक्के पाणीकपातीची शक्यता

मुंबईतील धरणांमधील जलसाठा कमी झाल्यामुळे शहरात सध्या 10 टक्के पाणीकपात लागू आहे. दरम्यान, पांजरापूर येथील मुंबई-3 अ उदंचन केंद्रात उच्चदाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईतील काही भागांमध्ये 25 टक्के पाणीकपात होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, हे काम 28 जुलै रोजी सकाळी 9 वाजल्यापासून 29 जुलै रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कालावधीत भांडुप जलशुद्धीकरण केंद्राकडे होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या कामाअंतर्गत 6.6 के.व्ही. उच्चदाब नियंत्रण पॅनेल बदलण्यात येणार आहेत. जुन्या 10 नियंत्रण पॅनेलच्या जागी नवीन 10 नियंत्रण पॅनेल बसवण्यात येतील. पहिल्या टप्प्यात 10 पैकी 4 पॅनेल बदलण्याचे काम केले जाणार आहे.

या कामामुळे भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या काही भागांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संबंधित भागांमध्ये 25 टक्के पाणीकपात लागू होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. नागरिकांनी आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number