Mumbai Water Crisis: मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट गडद; धरणांतील जलसाठा केवळ 7.8 टक्क्यांवर, प्रशासन घेणार मोठा निर्णय

मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील एकूण जलसाठा केवळ 7.8 टक्क्यांवर आला असून, पावसाने अद्याप अपेक्षित हजेरी न लावल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात केवळ एकाच दिवशी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. उलट, दररोज होणाऱ्या पाणीउपशामुळे जलसाठा झपाट्याने कमी होत […]

Mumbai Water Crisis: मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट गडद; धरणांतील जलसाठा केवळ 7.8 टक्क्यांवर, प्रशासन घेणार मोठा निर्णय

मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील एकूण जलसाठा केवळ 7.8 टक्क्यांवर आला असून, पावसाने अद्याप अपेक्षित हजेरी न लावल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो.

गेल्या आठवड्यात केवळ एकाच दिवशी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. उलट, दररोज होणाऱ्या पाणीउपशामुळे जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. गेल्या वर्षी पावसाळा वेळेआधी सुरू झाल्याने याच काळात धरणांमध्ये सुमारे 38 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा वेग मंदावल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या सात धरणांमधील सध्याचा एकूण जलसाठा केवळ 7.8 टक्के इतकाच शिल्लक आहे.

धरणांतील सध्याचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे 

उर्ध्व वैतरणा – 0 टक्के
मोडकसागर – 18.50 टक्के
तानसा – 0.41 टक्के
मध्य वैतरणा – 11.36 टक्के
भातसा – 5.85 टक्के
विहार – 44.83 टक्के
तुलसी – 21.12 टक्के

हवामान विभागाने पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला असला, तरी रविवारी अनेक भागांत एक थेंबही पाऊस पडला नाही. त्यामुळे आज आणि उद्या धरण क्षेत्रात किती पाऊस होतो, याचा आढावा घेऊन मुंबईत पाणी कपात लागू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 

दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत असून, पाऊस लांबल्यास मुंबईकरांना आणखी कठोर पाणीबचतीच्या उपाययोजनांना सामोरे जावे लागू शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number