मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेसाठी अर्थात सिनेटसाठी मंगळवार २४ सप्टेंबर २०२४ रोजी मतदान झाले. अधिसभेच्या दहा जागांसाठी (नोंदणीकृत पदवीधरांच्या जागा) २८ उमेदवार रिंगणात होते. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्रावर आणि ६४ बूथवर मतदान झाले. सुमारे ५५ टक्के मतदान झाले. आता मतमोजणी सुरू आहे. आदित्य यांची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्यात मुख्य लढत आहे. छात्र भारती आणि बहुजन विकास आघाडी यांनीही उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, शिवसेनेची विद्यार्थी संघटना यांनी उमेदवार उभे केलेले नाहीत.
मतदान : मंगळवार २४ सप्टेंबर २०२४, सुमारे ५५ टक्के मतदान
मतमोजणी : शुक्रवार २७ सप्टेंबर २०२४
शिउबाठा युवा सेनेच्या उमेदवारांची नावे
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांची नावे